क्राईम
लव्ह जिहाद प्रकरणातील ‘त्या’ आरोपीला भर चौकात फाशी द्या

मुंबईतील श्रद्धा वालकर हिच्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या प्रकरणातील आरोपीवर खटला न दाखल करता परिस्थितीजन्य पुरावे पाहून त्याला भर चौकात फाशी द्या, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.
आपल्या महाराष्ट्रातील एका मुलीची हत्या करण्यात आलेली आहे. ही बाब अतिशय संतापजनक आहे. त्या मुलीचे तुकडे तुकडे करून तिची हत्या करण्यात आली. त्या मुलीच्या वडिलांचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. त्या मुलीला समजून सांगण्याचा प्रयत्न झाला मात्र उपयोग झाला नाही. सध्या नवीन पिढी ऐकण्याच्या तयारीत नसते. या घटनेचा बोध घेऊन नव्या पिढीने सुधारले पाहिजे. या प्रकरणावरून कोणतेही राजकारण करता आरोपीला भर चौकात फाशी द्या, अशी मागणी राऊत यांनी केली.