क्राईम

मुलींनी जागरूक व्हायला हवे : कधी येणार अक्कल?

दिल्लीत तरुणीच्या हत्येची एक हृदयद्रावक घटना समोर आल्याने लोकांच्या अंगावर शहारे आले आहेत. २६ वर्षीय तरुणाने आपल्या मैत्रिणीचे ३५ तुकडे केले. यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे दिल्लीच्या विविध भागात फेकून दिले.
आफताब पूनावाला आणि श्रद्धाची प्रेमकहाणी अचानक क्राइम स्टोरीमध्ये बदलली. आता या घटनेवर ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी पोस्ट केली आहे. पोंक्षे यांनी त्याच्या फेसबुक अकाऊंटवर एका यूजरची पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी मुलींनी जागरूक व्हायला हवं, असे म्हटले आहे. श्रद्धा मुळची महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील होती.
मुलीच्या शोधासाठी तिचे वडील पालघर येथूनदिल्लीत आले. ते श्रद्धाच्या फ्लॅटवर पोहोचले तेव्हा त्याला कुलूप होते. त्यांनी मुलगी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करून मुलीच्या नात्याबाबत पोलिसांना सांगितले आणि बेपत्ता होण्यामागे आफताबचा हात असावा असा संशय व्यक्त केला.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आफताबचा शोध सुरू केला आणि त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.
चौकशीत आफताबने आपला गुन्हा मान्य केला. त्याने सांगितले की, श्रद्धा त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होती आणि त्यावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Back to top button