क्राईम

ब्रेकिंग! कुत्रा आडवा आल्याने कार झाडावर आदळली

कर्नाटकच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला आज पहाटे पाच वाजता अपघात झाला. वाहनासमोर अचानक कुत्रे आडवे आल्याने चालकाचा ताबा सुटल्याने कारची झाडाला धडक बसल्यामुळे हा अपघात घडला आहे.

यासंदर्भात कित्तूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हेबाळकर या बंगळूर येथून आपल्या कारने बेळगावकडे परतत होत्या. दरम्यान त्यांची कार पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर कित्तूरनजीक अंबरगट्टीजवळ जवळ आली असता कारच्या आडवे कुत्रे आल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्नात चालकाने आपले वाहन डाव्या बाजूला वळवल्याने कारची रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडक बसली.

अपघाताच्यावेळी हेब्बाळकर व त्यांचे भाऊ आमदार चन्नराज हटीहोळी हे जखमी झाले. तर चालक शिवप्रसाद व सुरक्षा रक्षक इराप्पा यांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button