महाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्यात नवा ट्विस्ट, ईव्हीएममध्ये शंभर टक्के घोटाळा

राज्यात विधानसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा सगळीकडे ईव्हीएम मशीन चर्चेत आलेल्या असतानाच महायुतीतील माजी नेते आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी ईव्हीएम हॅक करता येते, आयएम अल्सो द इंजिनिअर आय नो दॅट असे म्हणत मोठा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्या आहेत. ईव्हीएमवर माझा आक्षेप आहे. देशभरात आम्ही याविरोधात आंदोलन करू. भाजप कोणाला मुख्यमंत्री करेल, यात मला अजिबात पडायचे नाही. मात्र, अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये शंभर टक्के घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्याचा गंभीर आरोप जानकर यांनी केला आहे.

प्लेन हॅक करता येते तर हे का नाही. त्यामुळे लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर, त्यांनी बॅलेटच्या माध्यमातून लोकशाही आणावी. आम्ही केंद्र आणि राज्य सरकारचे स्वागत करू, असे ते म्हणाले.

Related Articles

Back to top button