महाराष्ट्र

ब्रेकिंग! एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली

  • राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या गावी साताऱ्याला गेले आहेत. सत्ता स्थापनेची गडबड सुरू असताना ते अचानक गावी गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. पण आता गावी आल्यानंतर शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आज त्यांना कोणालाही भेटता येणार नाही.
  • शिंदे यांची तब्येत आधीच काहीशी ठीक नसल्याने त्यांनी मुंबईतून गावाला जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच गुरुवारी मुंबईत होणारी महायुतीची बैठकही रद्द करण्यात आली होती. त्यानंतर शिंदेंनी अचानक साताऱ्यातील आपल्या दरे गावी जाण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी ते हेलिकॉप्टरने गावी पोहोचले. पण आता त्यांची प्रकृती अद्याप ठीक नसल्याची माहिती आहे. 
  • शिंदे यांना ताप आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदे आज आपल्या दरे गावातच विश्रांती घेणार आहेत. त्यामुळे ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच शिंदेंची प्रकृती बिघडल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

Related Articles

Back to top button