महाराष्ट्र

ईव्हीएमवर संशय! ‘या’ मतदारसंघात पुन्हा मतमोजणी होणार?

  • राज्यातील विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. मात्र यावेळी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 
  • तसेच राज्यातील अनेक मतदारसंघात मतांची तफावत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात न्याय मागण्यात येत आहे. अशातच आता शरद पवार गटाने थेट मैदानातच उडी घेतली आहे. कारण धाराशिवमध्ये फेर मतमोजणीसाठी शरद पवार गटाने मोठी रक्कम भरली आहे.
  • धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात फेर मतमोजणी करण्याची मागणी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे यांनी केली आहे. त्यामुळे त्यांचा परंडा या मतदारसंघात निसटता पराभव झाला आहे. परंतु आता मोटे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. कारण मोटे यांनी त्यासाठी तब्बल 8.5 लाख रुपये निवडणूक विभागाकडे जमा केली आहेत.
  • मोटे यांनी 18 मशीनची पुन्हा फेरमोजणी करण्यासाठी थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. कारण अपेक्षित मतदान न मिळालेल्या यंत्रावरील मतांची फेरमोजणी करण्याची मोटे यांनी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.

Related Articles

Back to top button