बिग ब्रेकिंग! राज्यात पुन्हा हेल्मेट सक्तीचे आदेश

राज्यात पुन्हा हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आता दुचाकीचालकासह त्याच्या सहप्रवाशाला देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाढते अपघात व मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल आहे. त्यामुळे आता हेल्मेट नसल्यास मोठा दंड भरावा लागणार आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघात वाढले आहेत. या अपघातात दुचाकी चालकासह सहप्रवाशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले होते. आत्तापर्यंत विना हेल्मेट नसलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई केली जात होती. मात्र, आता सहप्रवाशावर देखील करवाई केली जाणार आहे. या बाबत नवे बदल करण्यात आले आहे. पोलिसांच्या ई-चलन मशिनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. विधान सभा निवडणुकीनंतर ही कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. पुणे, सोलापूर आणि अन्य भागात विनाहेल्मेट वाहनचालकांवर सीसीटीव्हीमार्फत कारवाई केली जाणार आहे.