महाराष्ट्र

ब्रेकिंग! अचानक ७६ लाख मतांची वाढ कशी झाली? काँग्रेसचा प्रश्न

  • विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाले.
  • तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मत मोजणीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी वाढीव मतदानावरून निवडणूक आयोगावर टीका केली. जनतेची मत चोरण्याचे आणि डाका टाकण्याचे काम निवडणूक आयोग करत आहे, असे म्हणत राज्यात ७६ लाख मतांची वाढ कशी झाली? असा सवाल पटोलेंनी केला. यावर आता आयोगाने भाष्य केले आहे.
  • निवडणूक आयोगाने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पटोलेंनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, संध्याकाळी पाच वाजता मतदानाची टक्केवारी 58.22 टक्के (अंदाजे) होती आणि अंतिम मतदानाची टक्केवारी 66.05 टक्के आहे. मतांची टक्केवारी वाढणं हे मान्य आहे. कारण संध्याकाळी 6 वाजेनंतर रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या मतदाराने मतदान करेपर्यंत मतदान चालूच असते. 2019 मध्येही, संध्याकाळी 5 वाजतेपर्यंत मतदानाची टक्केवारी 54.43 टक्के (जवळपास) होती. तर अंतिम वेळी मतदान 61.10 टक्के इतके झाले होते, असे निवडणूक आयोगाने म्हटले.
  • महाराष्ट्रातील नागरी आणि निमशहरी भागात मोठ्या संख्येने मतदार संध्याकाळी मतदानाला येतात, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

Related Articles

Back to top button