महाराष्ट्र
जाणते राजे असणाऱ्या शरद पवार यांनी जनाधार गमावला

जाणते राजे असणाऱ्या शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत आपला जनाधार गमावला आहे. त्यामुळे त्यांनी राज्याचे आणखी वाटोळे न करता घरी बसावे, अशी टोकाची टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.
अहिल्यानगर येथील लोणी येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत विखे-पाटील यांनी बैठक घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना विखे-पाटील यांना पवार यांना टार्गेट केले.
शरद पवार जाणते राजे आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला जनाधार गमावला. त्यामुळे आता त्यांनी घरी बसावे. त्यांनी आतापर्यंत जनता आणि राज्याचे खूप वाटोळे केले. यापुढे त्यांनी ते करू नये, असा हल्लाबोल विखे-पाटील यांनी केला आहे.