महाराष्ट्र

भाजपची नवी चाल, ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होणार

  • राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची सुनामी आलेली पाहायला मिळाली. या निवडणुकीत महायुतीने २३५ जागा जिंकून प्रचंड विजय मिळवला तर महाविकास आघाडीची ५० जागा जिंकतानाही दमछाक झाली.
  • दरम्यान आज सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक घेणार आहेत. आजच मुख्यमंत्री पदाचे नाव फायनल होऊन मंत्रीपदाचा फॉर्म्युलाही ठरणार आहे. मात्र भाजपने तरुण आमदारांनाच मंत्री करणार असल्याचा नवा फॉर्म्युला तयार केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे ज्येष्ठ आमदारांचे टेन्शन वाढले आहे.
  • आज शहा हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा व मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित करतील, अशी चर्चा आहे. मंत्रिमंडळात भाजपचे २० मंत्री असतील. मात्र या नवीन मंत्रिमंडळात भाजप व महायुतीतील सहभागी पक्षही युवा आमदारांनाच संधी देतील, असेही बोलले जात आहे. त्यामुळे ज्येष्ठ आमदार आणि शिंदे सरकारमधील काही जणांना डच्चू मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपची भविष्यातील रणनीती म्हणून 50 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे.
  • भाजपकडून ‘पार्टी विद डिफरेंस’चा दावा केला जातो. लोकसभा निवडणुकीतही भाजपने अनेक कठोर निर्णय घेतले होते. त्यामुळे त्या निवडणुकीत अनेक नवीन चेहरे दिसले. आता राज्य पातळीवर नवीन नेतृत्व तयार करण्यासाठी भाजपची रणनिती सुरु आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील नवीन मंत्रिमंडळात भाजप जास्तीत जास्त युवा आमदारांना संधी देणार आहे. त्यात 50 वर्षांपेक्षा कमी वय हा निकष लावण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक जेष्ठ सदस्यांना मार्गदर्शकांच्या भूमिकेत जावे लागणार आहे.

Related Articles

Back to top button