महाराष्ट्र

गृह खाते कुणाकडे?

  • राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची सुनामी आलेली पाहायला मिळाली. या निवडणुकीत महायुतीने २३५ जागा जिंकून प्रचंड विजय मिळवला तर महाविकास आघाडीची ५० जागा जिंकतानाही दमछाक झाली.
  • दरम्यान महायुतीच्या सत्तावाटपामध्ये मुख्यमंत्रि‍पदासह इतर महत्वाची खाती भाजप स्वत:कडेच ठेवणार असल्याची माहिती मिळत आहे. सामान्य प्रशासन, गृह, महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंडळ ही महत्त्वाची खाती भाजपकडेच राहतील, अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.
  • यामुळे मात्र अजितदादा पवारांचे टेन्शन वाढल्याचे दिसत आहे. महत्वाची खाती भाजपकडे गेली तर अजितदादा अन् एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणती खाती असणार, हा मोठा प्रश्न आहे. तर अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला वित्त आणि नियोजन, सहकार, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री, गृहनिर्माण, कृषी ही खाती मिळण्याची शक्यता आहे. तर शिंदे यांच्या शिवसेनेला नगरविकास, उद्योग, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, राज्य उत्पादन शुल्क, पाणीपुरवठा ही खाते मिळण्याचा अंदाज आहे. कॅबिनेट आणि राज्यमंत्री यांच्या संख्या ठरविण्याचा अधिकार मुख्यमंत्री यांच्याकडे असतो.
  • पाच आमदारांमागे एक मंत्रिपद असे सूत्र भाजपकडून निश्चित केले जावू शकते. तसे झाल्यास भाजपकडे 25, शिवसेनेकडे 10 तर अजितदादा यांना 8 मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे

Related Articles

Back to top button