महाराष्ट्र

ब्रेकिंग! पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस

राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर, पुण्यात  पावसाने हजेरी लावली असून पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे. राज्यात ३ ते ४ ऑक्टोबर पर्यंत पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने सांगितला आहे.
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे राज्यात आतापर्यंत 96 टक्के पाऊस पडल्याची माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे. सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस हा शेतकऱ्यांना दिलासादायक आहे.

Related Articles

Back to top button