महाराष्ट्र

खुशखबर! ‘लाडकी बहीण’चा तिसरा हप्ता जमा होण्यास सुरूवात

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. याआधी या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि आता तिसरा हप्ता देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आजपासून तिसरा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाईल.
सरकारने जुलै महिन्यामध्ये या योजनेची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात पाठवले होते. परंतु अर्जात अडचणी असल्यामुळे अनेक महिलांना हे पैसे मिळाले नाहीत. आता त्यांच्या अर्जातील अडचणी दूर केलेल्या आहेत. अशा महिलांना या तीन हफ्त्यांचे एकूण साडेचार हजार रुपये दिले जाणार आहे. एक सप्टेंबरपासून अर्ज केलेल्या महिलांना फक्त एकाच महिन्याचे म्हणजे सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे महिलांनी खात्यावर पैसे जमा झाले आहेत की नाही याची माहिती घ्यावी.

अनेक महिलांनी अर्ज केले. परंतु या अनेक अडचणी होत्या. तसेच काही कागदपत्रांची पूर्तता झाली नव्हती. त्यामुळे अनेक महिलांना पैसे मिळाले नाही. ज्यांच्या खात्यात अजून एकही हप्ता आलेला नाही. त्यांनी लवकरात लवकर आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न करून घ्यावे.

Related Articles

Back to top button