महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंचे मोठे विधान

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. मात्र, ही योजना बंद पडेल, अशी टीका विरोधक करत आहेत. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबद्दल महत्वपूर्ण विधान करत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर दिवाणी न्यायालय ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचे आज उद्घाटन करण्यात आले. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आले. तत्पूर्वी शिंदे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, काही लोक टीका करत आहेत की, लाडकी बहीण योजना बंद पडेल. पण, मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की, बहिणींनो, घाबरू नका. ही योजना कधीही बंद पडणार नाही. ही योजना संसाराला हातभार लावणारी आहे, असे शिंदे म्हणाले.

या योजनेचा राज्यातील लाडक्या बहिणींच्या कुटुंबांना हातभार लागणार आहे. लाडक्या बहिणींच्या संसाराला हातभार लावण्यासाठीची ही योजना आहे. आता लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणी जोडा दाखवतील, असा टोला शिंदेंनी विरोधकांना लगावला.

Related Articles

Back to top button