हवामान

गाव साखरझोपेत असताना आभाळ फाटलं

  • राज्याला सध्या मुसळधार पावसाचा तडाखा बसत आहे. एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच दुसरीकडे पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट तर रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांत रेड अलर्ट दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
  • दरम्यान नांदेड जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. या पावसाने अनेक भागांना जोरदार तडाखा दिला आहे. मुखेड तालुक्यात पाच ते सहा गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हसनाळ गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातल्यामुळे अनेक नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. हसनाळ येथे ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. संपूर्ण गाव पाण्याखाली गेले असून घर, संसार पाण्यात बुडाला आहे. 

Related Articles

Back to top button