महाराष्ट्र
राज्यातील ‘या’ जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार?

- महाराष्ट्र विधानसभेचा निकाल अभूतपूर्व लागला आहे. कारण यावेळी महायुतीने सर्वाधिक जागा मिळवून सत्ता स्थापन करण्यावर भर दिला आहे. यावेळी महायुतीने 233 जागांवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या 51 जागांवर विजय मिळवता आला आहे. मात्र सर्वात धक्कादायक म्हणजे यावेळी विधानसभेला काँग्रेसचे दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
- या विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण राज्यात तब्बल 20 जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. यावेळी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
- यावेळी धुळे, जालना, बीड, हिंगोली, धाराशिव, पुणे, छ. संभाजीनगर, सोलापूर, सातारा, अमरावती, वर्धा, कोल्हापूर, बुलढाणा, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, रायगड, जळगाव या जिल्ह्यातून काँग्रेसला प्रभाव करावा लागला आहे.