महाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्यात नव्या फॉर्म्युलाची चर्चा

विधानसभा निवडणुकीचा धुराळा संपलेला आहे. पण आता सर्वांना नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ स्थापनेचे वेध लागलेले आहेत. महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली अन् 200 पेक्षा अधिक उमेदवारांना निवडून आणण्यात यश मिळवले. अडीच वर्षाच्या कालावधीत महायुतीने अनेक लोकोपयोगी योजना आणल्या. तसेच अनेक विकासकामे देखील केली आहेत. याचाच परिणाम निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळाला.

राज्यात आता सगळ्या जनतेला मुख्यमंत्री कोण होणार? याचे वेध लागलेले आहेत. दरम्यान राजकीय वर्तुळातून मुख्यमंत्रि‍पदासाठी महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवला जावू शकतो, अशी शक्यता वर्तवली जातेय. महाराष्ट्रात बिहारप्रमाणेच मुख्यमंत्री पॅटर्न राबवले जावू शकतो, असे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे नियोजन असल्याची माहिती समोर येत. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी दाट शक्यता आहे.

राज्यात भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला असून केंद्रातील सर्वोच्च नेतृत्वाने दूरदृष्टीने निर्णय घेतले आहेत. विजयाचे समीकरण कायम ठेवत महायुती भक्कम ठेवणं गरजेचे आहे. त्यामुळे कदाचित राजकीय समीकरण म्हणून महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार नसल्याची शक्यता आहेत. तर भाजप दिलेला शब्द पाळत नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी 2019 च्या निवडणुकीत केला होता. त्यामुळे ठाकरे खोटं बोलतात, हे सिद्ध करण्यासाठी कदाचित भाजप पुन्हा शिंदे यांना संधी देवू शकते.

भाजपकडून विजयाचे श्रेय आणि मित्रपक्षांना समान संधी दिली जाते. त्याचप्रमाणे राज्यात आणि केंद्रात मित्रपक्षांना भाजपकडून सन्मानाची वागणूक दिली जाते, हे सिद्ध करण्यासाठी देखील मुख्यमंत्रि‍पदी शिंदे यांची वर्णी लागते. दरम्यान अजून भाजपकडून मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Related Articles

Back to top button