महाराष्ट्र
‘हे’ 20 मंत्री घेणार शपथ?

- महाराष्ट्रात महायुतीला जबरदस्त यश मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपच्या 132 जागा, शिवसेनेच्या 57 जागा तर राष्ट्रवादीच्या 41 जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे राज्यात महायुतीचीच पुन्हा सत्ता येणार आहे.
- राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सध्या चर्चा सुरु झाली आहे ती मुख्यमंत्रीपदाची. राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे लक्ष लागले आहे. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत सर्वात प्रबळ दावेदार आहेत. दुसरीकडे संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे पाच आणि राष्ट्रवादीचे पाच मंत्री शपथ घेणार आहेत. तर भाजपचे दहा मंत्री शपथ घेणार असून संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे.
- पहिल्या टप्प्यात एकूण वीस मंत्री शपथ घेणार आहेत. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई हे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे कळत आहे. तर राष्ट्रवादीकडून अजितदादा पवार, अदिती तटकरे, अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील शपथ घेणार आहेत. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेंस अजूनही कायम आहे.