राजकीय

ब्रेकिंग! ईव्हीएमचा घोळ? 95 मतदारसंघांतील आकडेवारीवर संशय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अलिकडे जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला असला तरी विरोधकांना या निकालाबाबत संशय आहे. त्यातच आता एकूण 95 मतदारसंघांमध्ये मतदान आणि मतमोजणी यामध्ये तफावत आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

मतदारांनी भरभरून मते दिल्याने महायुतीने 230 जागा जिंकल्या. तर, महाविकास आघाडी केवळ 46 जागांवर मर्यादित राहिली. हा निकाल अविश्वसनीय असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे. त्यातच आता ईव्हीएमबद्दलचा संशय निर्माण करणारी आकडेवारीही समोर आली आहे. एकूण 288पैकी 193 मतदारसंघांमध्ये प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतमोजणीचा आकडा जुळला आहे. मात्र, उर्वरित 95 मतदारसंघ असे आहेत की, मतदान आणि मतमोजणीत तफावत आढळली आहे. त्यापैकी 19 मतदारसंघांमध्ये ईव्हीएममध्ये जास्त मतांची नोंद झाल्याचे आढळले. तर, 76 मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या तुलनेत ईव्हीएममध्ये कमी मतांची नोंद झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. परिणामी ईव्हीएमवरून पुन्हा एकदा वादंग निर्माण होऊ शकतो.

आमगाव, उमरखेड, लोहा, औरंगाबाद पूर्व, भोसरी, परळी, देगलूर, हिंगोली, वैजापूर, कळवण, चांदवड, दिंडोरी, कागल, बोईसर, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले, करमाळा, सोलापूर दक्षिण आणि मालेगाव मध्य या 19 मतदारसंघांमध्ये मतदानाच्या तुलनेते जास्त मते आढळली.

तर अक्कलकुवा, गंगाखेड, विलेपार्ले, नवापूर, पाथरी, चांदिवली, साक्री, मालेगाव बाह्य, आंबेगाव, इंदापूर, अकोला पश्चिम, बारामती, निफाड, मावळ, मोर्शी, नालासोपारा, सावनेर, भिवंडी पश्चिम, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, कल्याण ग्रामीण, लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, औसा, तुळजापूर, माढा, कामठी, आरमोरी, अहेरी, बल्लारपूर, चिमूर, मीरा भाईंदर, वणी, कोपरी पाचपाखाडी, कळमनुरी, कोल्हापूर उत्तर, सोलापूर शहर मध्य या मतदारसंघंमध्ये एकूण मतदानाच्या तुलनेत कमी मते आढळली.

Related Articles

Back to top button