क्राईम

ब्रेकिंग! वैष्णवी आत्महत्या प्रकरणात जबर कारवाई

  • वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेल्या कारागृहाचे महानिरिक्षक जालिंदर सुपेकर यांना गृहविभागाने दणका दिला असून सुपेकर यांच्याकडून नाशिक, संभाजीनगर नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक अतिरिक्त पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. याबाबत गृहविभागाने आदेशदेखील जारी केले आहेत. वैष्णवी आत्महत्या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता सुपेकर यांना दणका देत त्यांच्याकडील कारागृह उपमहानिरीक्षक अतिरिक्त पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे.
  • काही वेळापूर्वी वैष्णवीच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपींच्या वकिलांकडून होणारे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच पत्रकार परिषदेत मुलाच्या जन्मपत्रिकेत जालिंदर सुपेकर हे मुलाचे मामा असल्याचे नाव आहे, असेही सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच सुपेकरांकडून कार्यभार काढून घेण्यात आला आहे. सातपुते हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महानिरिक्षक आहेत. त्यांच्याकडे कारागृह उपमहानिरिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. मात्र, आता हा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे.
  • सुपेकर हे वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेचे मामा आहेत. त्यांची माहिती घेतली असता या मामांचा धाक दाखवून दोन्ही सुनांवर हगवणे कुटुंबियांनी अत्याचार केल्याचा दावा दमानिया यांनी केला होता. एवढेच नव्हे तर, सुपेकर यांच्यावर पाचशे कोटींच्या स्कॅमचा आरोप असून यासंदर्भात त्यांची चौकशी सुरू आहे.
  • तसेच हगवणे कुटुंबिय मोठी सून मयुरीला तू आमचे काहीही बिघडू शकत नाही, आमचे हात फार मोठे आहेत, अशी धमकी देत असल्याचे दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.

Related Articles

Back to top button