राजकीय

मुंबईत मोठी घडामोड! उद्धव ठाकरेंना दणका

  • आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर जोरात सुरू आहे. ठाकरे गटातील माजी आमदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी धनु्ष्यबाण हाती घेतला आहे. आताही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धक्का देणारी बातमी मुंबईतून आली आहे. 
  • मुंबईतील ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे यांनी शिवेसनेचा भगवा त्यांच्या हाती देत पक्षात स्वागत केले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे.
  • ठाणे तसेच गोवा राज्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे. ठाण्यात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात आमदार दिलीप लांडे, सचिव राम रेपाळे उपस्थित होते. या पक्ष प्रवेशाने शिवसेना वर्धापनदिनीच मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
  • आज ठाकरे गटाचे विभागप्रमुख आणि माजी नगरसेवक अजित भंडारी, शाखाप्रमुख संजय जंगम, प्रभाग क्रमांक १६१ चे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे, प्रभाग क्रमांक १४० च्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेविका नादिया शेख आणि शिवसेना युवासेना सचिव मोहसीन शेख यांनी शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला.

Related Articles

Back to top button