राजकीय
पाच कोटी रुपये वाटल्याच्या आरोपावर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया

मतदानाच्या एकदिवस आधी पैसे वाटप केल्याचा आरोपावरुन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे अडचणीत सापडले आहेत. तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. यावरुन विरारमध्ये मोठा राडा पाहायला मिळत आहे. बविआचे प्रमुखे हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर देखील घटनास्थळी पोहोचले आहेत.
मागील अनेक तासांपासून विवांता हॉटेलमध्ये अडकलेल्या तावडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. तावडे यांना म्हटले की, नालासोपाऱ्यात आज कार्यकर्त्यांची बैठक होती. मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचे नियम काय आहेत, हे सांगायला मी इथे आलो होतो. मात्र हिंतेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांचा असा गैरसमज झाला की, मी इथे पैसे वाटायला आलो आहे. जर पैसे वाटप होत असेल तर पोलीस आणि निवडणूक आयोग याबाबत चौकशी करतील.



