महाराष्ट्र

ब्रेकिंग! …तर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देऊ

  1. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आज शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुण्यात झाला. यावेळी त्यांनी लाडक्या बहिणांना आवाहन करत आणखी एक खूशखबर दिली. जर तुम्ही सरकारला आणखी ताकद दिली तर दीड हजाराचे पावणे दोन हजार, पावणे दोन हजाराचे तीन हजारही होतील, असे शिंदे यांनी सांगितले. 
  2. लाडक्या बहीणीला ही सरकारची ओवाळणी असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले. ही योजना फेल जावी, यासाठी विरोधक प्रयत्न करत होते. कोर्टातही गेले होते. काहींनी पंधराशे रूपये देतात याची टिंगल केली. पण जे सोन्याचा चमचा घेवून जन्माला आले, त्यांना पंधराशे रूपयांचे मोल काय समजणार, असा सवाल शिंदे यांनी केला. 
  3. या योजनेबाबत अपप्रचारही केला गेला. ही योजना बंद होणार असेही सांगितले. निवडणुकीच्या तोंडावर केलेला हा जुमला असल्याचेही सांगितले गेले. पण काही झाले तरही ही योजना बंद करणार नाही असे शिंदे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. 
  4. लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही आता पंधराशे रूपये देत आहोत. जर तुम्ही पुढच्या काळात सरकारचे हात आणखी मजबूत केले तर याच पंधराशेचे पावणे दोन हजार होतील. पुढे दोन हजार होतील आणि दोन हजाराचे तीन हजारही होतील, असे शिंदे यांनी सांगितले. 

Related Articles

Back to top button