राजकीय
ब्रेकिंग! राज ठाकरे म्हणाले, निवडणुकीनंतर राज्यात…
- विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवसच बाकी आहेत. त्यामुळे निवडणुक प्रचाराला चांगलाच रंग चढला आहे. दरम्यान या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही उमेदवार दिले आहेत.
- या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे प्रचार सभा घेत आहेत. आता राज यांनी एका वृत्तवाहिनीला नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मोठे आश्चर्याचे धक्के महाराष्ट्रात बसतील, असे वक्तव्य राज यांनी केले आहे. राज्यात सध्याची परिस्थिती अशी आहे की, निवडणुकीत काय होईल याचा अंदाज कुणालाच बांधता येणार नाही. त्यात राज यांनी केलेल्या या वक्तव्याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. राज्यात निकालानंतरची परिस्थिती काय? याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
- या प्रश्नाचे उत्तर देताना राज म्हणाले, या निवडणुकीत काय होईल हे कुणीच सांगू शकत नाही. मला वाटते, यावेळी राज्यात अनेक गोष्टींचे वेगवेगळे सरप्राईज मिळतील. त्यामुळे आणखी आठ ते दहा दिवस थांबा. मग तुम्हाला समजेल की काय सरप्राईज आहेत. सरप्राईज आहे म्हटल्यानंतर आधीच कसे सांगणार, असे राज म्हणाले. त्यांच्या या विधानाची आता चर्चा सुरू झाली आहे.