राजकीय
ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला
- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज मुंबईत शेवटची सभा पार पडली. यावेळी मोदींनी राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असून सभेतील लोकांना शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. यावेळी मोदींनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणले की, तुम्ही राहुल गांधींकडून बाळासाहेब ठाकरेंना हिंदूहृदयसम्राट वदवून घ्या, तुम्हाला चांगली झोप येईल व रुग्णालयात जायची गरज राहणार नाही, असा टोला मोदींनी लगावला.
- राज्यात आपल्या अखरेच्या सभेत मोदींनी पुन्हा एकदा भाजप महायुती आहे तर गती आहे. महाराष्ट्राची प्रगती असल्याचा नारा दिला. मोदी म्हणाले, मुंबई बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वांचे शहर आहे. स्वाभिमानाचे शहर आहे. पण महाआघाडीत एक असा पक्ष आहे, ज्यांनी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आपला रिमोट कंट्रोल दिला आहे.
- त्यामुळे मी यांना आव्हान दिले होते की, काँग्रेसच्या तोंडातून, राहुल गांधींच्या तोंडून बाळासाहेबांचे कौतुक करणारे काही शब्द बोलून दाखवावे. राहुल गांधींनी तोंडातून एकदा तरी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे बोलून दाखवावे. एवढं जरी केले तरी तुम्हाला चांगली झोप लागेल आणि दवाखान्यात जाण्याची गरज लागणार नाही. बाळासाहेबांचे आशीर्वाद मिळतील. आजपर्यंत हे लोक काँग्रेसकडून, राहुल गांधींकडून बाळासाहेबांचे कौतुक करून घेऊ शकले नाहीत, असे मोदी यांनी म्हटले.