क्राईम
ब्रेकिंग! वाल्मिक कराडला बॅक टू बॅक झटके

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण आज कराडला बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते, त्यावेळी एक धक्कादायक बाब उघडकीस आल्याने कराडला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या कराडवर मकोका लावण्यात आला आहे. अशातच आता देशमुख हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका कराडवर ठेवला आहे. त्यामुळे आज बीड न्यायालयात कराडला हजर केल्यावर एसआयटीचे प्रमुख अनिल गुजर यांनी कराडचा देशमुख खून प्रकरणात सहभाग असल्याचा पुरावाच न्यायालयाला दिला आहे.
कारण ज्या दिवशी देशमुख यांची हत्या झाली, अगदी त्याच दिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांचे कराड याच्याशी फोनवरून बोलणे झाले असल्याचे समोर आले आहे.