राजकीय

जम्मू-काश्मीर, हरियाणात कोण मारणार बाजी?

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित सत्ताधारी एनडीएविरोधात प्रभावी कामगिरी केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये आणि हरियाणात काँग्रेसप्रणित विरोधी पक्षला यश मिळणार असल्याचे काल जाहीर झालेल्या एक्झिट पोलमधून स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्या मोठ्या निवडणुकीत जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान झाले. गेल्या दहा वर्षांतील ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. जम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच एक्झिट पोलनुसार केंद्रशासित प्रदेशातील हिंदूबहुल जम्मू भागातून भाजप आपल्या सर्व जागा जिंकेल.
हरियाणात गेल्या दशकभरात पहिल्यांदाच काँग्रेस भाजपला हुसकावून लावत सरकार स्थापन करणार आहे. आधीच सत्ताविरोधी लहरीशी झुंज देत असलेला भाजप राज्यातील शेतकरी, पैलवान, त्यांचे कुटुंबीय आणि तरुणांच्या (अग्निवीर योजना, बेरोजगारी) संतापाला सामोरे जात निवडणुकीच्या रिंगणात उतरला.

Related Articles

Back to top button