ब्रेकिंग! अखेर शरद पवारांनी अजितदादांना तो प्रश्न विचारलाच

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पवार यांनी आता 85 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त पवारांचे पुतणे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांना ‘एक्स’ हँडलवर एक खास ट्विट करत वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या.
पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अजितदादा हे शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले होते. अजितदादा पवारांसोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ देखील होते. पवार अन् अजितदादा यांच्यामध्ये तब्बल 35 मिनिट चर्चा झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान या भेटीत मात्र पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला प्रश्न अजितदादा यांना विचारला? प्रश्न नेमका कोणता आणि त्यावर अजितदादांनी काय उत्तर दिले ते जाणून घ्या.
या भेटीनंतर अजितदादा यांनी नेमकी काय चर्चा झाली याबद्दल माहिती दिली. यामध्ये एक प्रश्न असा होता, त्याच्या उत्तराची वाट महाराष्ट्राची जनताही पाहत आहे. अजितदादांनी सांगितल्यानुसार, महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आहे आणि अधिवेशन केव्हा सुरू होणार? असे प्रश्न पवारांनी विचारले. यामधील मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.