महाराष्ट्र
महाराष्ट्रातून मतदार यादीबाबत तक्रारींचा पाऊस

- ईव्हीएम मशिनसह इतर अनेक मुद्यांवर विरोधकांनी रान माजवले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तर ही चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली. ईव्हीएममध्ये गडबड केल्याप्रकरणात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातून सर्वाधिक तक्रारी करण्यात आल्या होत्या. याप्रकरणात आता निवडणूक आयोगाने मोठी ॲक्शन घेतली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने अनेक बदल करण्यात येणार आहेत.
- निवडणूक काळात निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी येतात. या समस्या शोधण्यासाठी मतदार केंद्रनिहाय व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदार यादी तयार करणे, मतदान दरम्यान ईव्हीएमची व्यवस्था, देखभाल करणे, मॉक पोल, मतदानाचा टक्का याविषयीच्या ज्या तक्रारी करण्यात येणार त्याची इत्यंभूत माहिती घेऊन ती सोडवण्यात येईल. मतदान केंद्र अधिकारी आणि मतदान केंद्र एजंट यांना यासाठी लागलीच प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- निवडणूक आयोगाच्या मते, निवडणुकीसंबंधीत प्रत्येक प्रक्रियेसाठी एक निश्चित नियम आहे. निवडणुकीदरम्यान त्यात एखादी गडबड असेल तर त्यासाठी नियमांच्या पायऱ्यांचे पालन करणे आवश्यक आहे. काही किरकोळ तक्रारी असतात. काही चुका होतात. या तांत्रिक चुका असतात, त्या मुद्दाम केल्या जात नाही तर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना माहिती नसल्याने त्या चुका होतात. त्याविषयी आता प्रशिक्षण देण्यात येईल.



