सोलापुरातील सुप्रसिद्ध मेंदूरोग तज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवले होते. दरम्यान डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण यामध्ये एका महिलेचे नाव समोर आले आहे. या महिलेची ओळख देखील पटली असून वळसंगकर यांनी या महिलेमुळेच आत्महत्या केल्याचे लिहिले आहे. त्यामुळे आता या महिलेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनीषा मुसळे- माने असे या महिलेचे नाव आहे. ही महिला डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या. त्यांच्याकडून रूग्णांकडून येणारे बिल ही कोणतीही नोंद न करता स्विकारली जात होती. ही गोष्ट डॉ. वळसंगकरांना खटकल्याने त्यांनी ही रक्कम स्विकारणाऱ्या महिलेला कामावरून काढून टाकले होते. मात्र तिने वळसंगकरांना आत्महत्येची धमकी दिली होती. मात्र, डॉ. वळसंगकरांना रूग्णालयाचे सर्व व्यवहार कागदोपत्री हवे होते. प्रशासनाकडून हे केले जात नसल्याने डॉ. वळसंगकर तणावाखाली होते. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.