डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट

Admin
1 Min Read
  • सोलापुरातील प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली केवळ सोलापुरातच नाही तर राज्यभरात प्रसिद्ध असलेले वळसंगकर यांनी वयाच्या या टप्प्यात टोकाचे पाऊल का उचलले यावरुन अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत.
  • दरम्यान रुग्णालयाच्या व्यवहारातून बेदखल केल्यामुळे ते निराश झाले होते आणि यातूनच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
  • डॉ. वळसंगकर यांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री अपेक्षित असताना रुग्णालयांकडून नोंद न करता पैसे आकारले जात होते. यावर वळसंगकर यांनी आक्षेप नोंदवला होता. याशिवाय जी महिला कर्मचारी अशा प्रकारे रुग्णांकडून पैसे घेत होती, तिलाही वळसंगकर यांनी कामावरुन काढून टाकले होते, अशीही माहिती सांगितली जात आहे. या महिला कर्मचाऱ्याला कामावरुन काढून काढल्यामुळे तिने आत्महत्येची धमकी डॉक्टरांना दिली होती. या सर्व प्रकरणामुळे डॉक्टर तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे.
  • दरम्यान आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री उशीरा हा गुन्हा दाखल करता आला. महिलांना रात्री अटक करण्याची परवानगी पोलिसांना नसते. त्यामुळे न्यायालयाची विशेष परवानगी घेऊन अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Share This Article