क्राईम

ब्रेकिंग! भारत एक क्रूर शत्रू, मी तो हल्ला….

  • जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २8 जणांना आपला जीव गमवावा लागला. यामागे लष्कर-ए-तोयबाचा उपकमांडर सैफुल्लाह कसुरी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आता भारताच्या कारवाईनंतर कसुरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्याने भारतावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच स्वतः हल्ल्याचा निषेध केला आहे आणि त्यासाठी आपण जबाबदार नसल्याचे म्हटले आहे.
  • पहलगाम हल्ल्यानंतर काल रात्री झालेल्या सीसीएस बैठकीत भारताने पाच मोठे निर्णय घेतले. यामध्ये सिंधू पाणी करार थांबवण्यासह अनेक कठोर पावले उचलण्यात आली. यानंतर सैफुल्लाह याने एक निवेदन आणि एक व्हिडिओ जारी केला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्याने सांगितले. तसेच हा हल्ला देखील भारतानेच घडवून आणल्याचे सांगत हे भारताचे षड्यंत्र आहे, असा गंभीर आरोप केला आहे.
  • कसुरीने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. या हल्ल्याच्या बहाण्याने भारतीय माध्यमांनी मला जबाबदार धरले आहे. पाकिस्तानवरही आरोप करण्यात आले आहेत. ही दुःखद गोष्ट आहे. भारत पाकिस्तानला नष्ट करू इच्छितो. तो एक क्रूर शत्रू आहे. त्याने काश्मीरमध्ये दहा लाखांचे सैन्य पाठवून युद्धाचे वातावरण निर्माण केले आहे, असे म्हटले आहे.

Related Articles

Back to top button