क्राईम

18 वर्षांचा कोवळा तरुण आणि त्याच्याच वयाची गर्लफ्रेंड

  • सध्या महाराष्ट्रात अगदी कोवळ्या वयात प्रेमात पडणे व त्यानंतर नको ते पाऊल उचलण्याच्या घटना वाढल्या आहेत. ठाण्यातील मुंब्रा परिसरातील अमृतनगरमध्ये आज ऐन पाडव्याच्या दिवशी अशीच एक घटना उघडकीस आली. आपल्या मैत्रिणीसोबत फोनवर कडाक्याचे भांडण झालेल्या १८ वर्षीत विद्यार्थ्याने गळफास घेऊन स्वतःला संपवले. या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. पोलिस या प्रकरणाचा शोध घेत आहेत. मात्र एवढे टोकाचे पाऊल उचलण्याचे नेमके कारण काय, हे समजले नाही.
  • ठाण्यातील अमृतनगरमध्ये आज एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ऐन पाडव्याच्या दिवशी ही घटना उघडकीस आली. कुटुंबाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह खाली घेऊन पंचनामा करुन तो पोस्टमार्टमला पाठवला. प्राथमिक तपासात, या विद्यार्थ्याचे त्याच्या गर्लफ्रेंडसोबत मोबाईलवर बोलणे सुरु होते. त्यात या दोघांमध्ये वाद झाला. या विद्यार्थ्याने फोन ठेवल्यावर लगेच आत्महत्या केली, असे सांगितले जात आहे.
  • पोलिसांच्या माहितीनुसार, मृत तरुण फोनवर आपल्या मैत्रिणीशी बोलत होता. या दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि हा वाद इतका टोकाला गेला की, मानसिक तणावाखाली असलेल्या तरुणाने स्वतःला संपवले.
  • पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी तो पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून भांडणाचे नेमके कारण काय होते? त्याच्या आत्महत्येमागे अजून काही कारण आहे का? याचा तपास सुरु आहे.

Related Articles

Back to top button