राजकीय
गद्दार शब्द ऐकताच मुख्यमंत्री शिंदे भडकले
- विधानसभा निवडणुकीचा प्रचार तापू लागला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या चांदिवलीत प्रचारासाठी गेले होते. चांदिवली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नसीम खान हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या कार्यालयाबाहेरुन शिंदे यांचा ताफा जात होता. ताफा जात असताना काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ‘गद्दार, गद्दार’च्या घोषणाही देण्यात आल्या. त्यानंतर मुख्यमंत्री चांगलेच संतापले. त्यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. संतोष कटके या तरुणाने शिंदे यांना उद्देशून अपशब्द वापरले. यामुळे शिंदे यांच्या संतापाचा पारा चढलेला पाहायला मिळाला.
- मुख्यमंत्र्यांचा रौद्रावतार कॅमेरामध्ये चित्रित झालेला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कटके यानी काल मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला आणि त्याने गद्दार गद्दार अशा घोषणा दिल्या होत्या.
- ‘ऐसा सिखाते हे क्या आप लोग?’, अशा शब्दांत शिंदे विचारला. यानंतर पोलिसांनी कटके आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, नंतर त्यांना सोडून देण्यात आले.