राजकीय

निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा गटाला झटका

  1. राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जोमात सुरू आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले आहे. आता उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, नवी दिल्लीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. अजितदादा गट सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत नसल्याचा आरोप शरद पवार गटाने केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने अजितदादा गटाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.
  2. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. आमच्याकडून जाहिरातीच्या प्रत्येक ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असा डिस्क्लेमर दिला जात आहे, असे अजितदादा गटाने सांगितले. परंतु शरद पवार गटाने त्यावर आक्षेप नोंदवला.
  3. तुम्ही प्रत्येक दिवशी येणाऱ्या जाहिरातीमध्ये प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असा डिस्क्लेमर देत आहात का? अशी विचारणा कोर्टाने अजितदादा यांच्या वकिलाला केली. त्यावर दररोज नाही, मात्र गरजेच्या ठिकाणी आम्ही प्रकटीकरण देत आहोत, असे अजितदादा गटाने सांगितले. त्यावर पुढच्या २४ ते ३६ तासांमध्ये डिस्क्लेमर देणे अनिवार्य असेल, असे निर्देश कोर्टाने दिले.

Related Articles

Back to top button