क्राईम

बर्थ डे साठी जमले, पार्टी केली, दारू प्यायले आणि…

  • वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान घडलेली एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर थोड्याच वेळात एक ३० वर्षीय तरुण खून झाल्याची घटना घडली. मृत युवकाचे नाव आकाश पवार (वय ३०) असून आरोपी मनीष पांडे (वय ३७) याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली आहे.
  • ही घटना पालघर जिल्ह्यातील वसई परिसराच्या उमेलमान फाटा भागात घडली. रविवारी रात्री आकाश आणि त्याचे मित्र एमआयडीसी मैदानात एका भंगार दुकानाजवळ पार्टी करत होते. पार्टीदरम्यान मद्यप्राशन झाले. त्यानंतर आरोपी मनीष तिथे आला आणि आकाशला पार्टीमधून बाहेर बोलावले. बाहेर गेल्यानंतर त्याने आकाशवर धारदार चाकूने सपासप वार केले. हल्ला इतका भयंकर होता की, आकाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
  • ही घटना पाहून पार्टीतील राहुल भुरकुंड नावाचा मित्र भांडण सोडवण्यासाठी पुढे गेला. त्याच्यावरही मनीषने चाकूने हल्ला केला आणि तो गंभीर जखमी झाला. आकाशने प्रतिहल्ला करत असताना आरोपी मनीषही जखमी झाल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मनीष हा एक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली असून हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Back to top button