राजकीय

भाजपची हॅटट्रिक हुकणार, किती जागा जिंकणार?

  • राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष उमेदवारांची नावे निश्चित करण्यात व्यस्त आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच महायुतीतील घटक पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाच्या सत्तेत पुनरागमनासाठी आरएसएसचे अंतर्गत सर्वेक्षण समोर आले आहे. सर्वेक्षणात महायुतीला 160 जागा मिळण्याचा दावा करण्यात आला आहे.
  • तसेच आरएसएसच्या सर्वेक्षणानुसार विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळणार आहे. वातावरण जाणून घेण्यासाठी गोपनीयपणे अंतर्गत सर्वेक्षण केले जाते आणि अहवालाच्या आधारे निवडणुकीची रणनीती आखली जाते. संघाने ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सर्व 288 जागांवर हे सर्वेक्षण केले आहे.
  • तर संघाच्या सर्वेक्षणानुसार महायुतीला निवडणुकीत 160 हून अधिक जागा मिळतील. भाजपाला 90 ते 95 जागा, शिंदे यांच्या सेनेला 40-50 जागा आणि अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीला 25-30 जागा मिळू शकतात. लोकसभा निवडणुकीत भाजपाशी असंतुष्ट असलेल्या आणि आघाडीला मतदान करणाऱ्या मतदारांवर हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 

Related Articles

Back to top button