राजकीय

ब्रेकिंग! जरांगेंच्या आंदोलनामागचे मास्टरमाइंड शरद पवार

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर काल अजय बारसकर महाराज यांनी ‘नेहमी पलटी मारतो आणि गुप्त बैठकी घेतल्याचा’ गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर आता मराठा सहकारी संगीता वानखेडे यांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केला. जरांगे मराठा समाजाला विश्वासात घेत नव्हते, तर त्या फोनला विश्वासात घ्यायचे. हा फोन शरद पवारांचा असल्याचा गंभीर आरोप वानखेडे यांनी केला. या आंदोलनाचा खर्च देखील पवारांनीच केल्याचा गौप्यस्फोट वानखेडे यांनी केला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत वानखेडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केला आहे. हा लढा आरक्षणासाठी उभारला होता. मग आता स्वतंत्र आरक्षण मिळाले आहे, ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांनाही ओबीसीतून आरक्षण मिळतेय ना, मग हा अट्टाहास कशासाठी? असा खडा सवाल वानखेडे यांनी उपस्थित केला आहे.
जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारच का, असे पत्रकारांनी विचारले असता वानखेडे म्हणाल्या, जरांगेंनी ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा लढा उभारला, तेव्हा त्यांना सर्वपक्षीय नेते भेटायला गेले होते. मात्र जरांगे यांनी कोणत्याच पक्षाच्या नेत्याबाबत मनापासून प्रतिक्रिया दिली नाही. पण ज्यावेळेस शरद पवार आंदोलनस्थळी गेले, त्यावेळेस त्यांच्याबाबत जी आत्मियता होती, जे प्रेम उफाळून येत होते, ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. त्यामुळेच या आंदोलनामागे शरद पवार असल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे.

Related Articles

Back to top button