सोलापूर

ब्रेकिंग! सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला तगडा झटका

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नाट्यमय घटना होताना दिसत आहेत. त्यातच महाविकास आघाडीला राजकीय धक्के बसत आहेत. आता सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला तगडा झटका बसला आहे. 

काँग्रेसचे जेष्ठ नेते, अक्कलकोटचे माजी आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. म्हेत्रे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ३१ मे रोजी म्हेत्रे हे कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आगामी काळात अक्कलकोट तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button