देश - विदेश
ब्रेकिंग! पेट्रोल-डिझेल भारतातून हद्दपार करणार

- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात विविध मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली.
- त्यांनी अवैध बांधकामांवरील कठोर भूमिकेपासून ते पेट्रोल-डिझेलमुक्त भारताच्या संकल्पापर्यंत आपले विचार मांडले. याशिवाय त्यांनी आपल्या फिटनेस प्रवासाविषयी देखील मोकळेपणाने सांगितले की, त्यांनी तब्बल ५० किलो वजन कमी केले आहे.
- गडकरींनी पुन्हा एकदा देशातून पेट्रोल आणि डिझेल हद्दपार करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, भविष्यातील वाहने ही इलेक्ट्रिक, इथेनॉल, बायोडिझेल आणि हायड्रोजनवर चालणारी असावीत, यासाठी ते काम करत आहेत. त्यांनी अनेक मोठ्या महामार्गांची यशस्वीरित्या निर्मिती केली असल्याचे नमूद करताना एक खासगी अनुभवही शेअर केला – माझ्या घरासमोरील फक्त दोन किमी रस्ता तयार होण्यासाठी मला १३ वर्षे लागली.



