राजकीय
फडणवीसांना कात्रजचा घाट दाखवला
- ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा पवार यांनी भाजपला मोठा धक्का दिला. अजितदादा यांनी मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे.
- भाजप नेते नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यास सतत विरोध करत होते. तरीदेखील अजितदादा यांनी त्यांना रिंगणात उतरवले आहे. अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे जेष्ठ नेते नवाब मलिक यांनी आज मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
- भाजपच्या राजकीय दबावाला न जुमानता अजितदादा यांनी मलिक यांना मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज भरणाऱ्या शेवटच्या दिवशी मलिक यांना मानखुर्द जागेसाठी राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. मलिक आता या जागेवरून महायुतीचे उमेदवार आहेत. मलिक हे अणुशक्तीनगरचे विद्यमान आमदार आहेत. त्यांना तिकीट न देण्यासाठी भाजपकडून सातत्याने दबाव आणला जात होता.