देश - विदेश

ऐ डर अच्छा लगता है! भारताच्या हल्ल्याची भीती, पाकिस्तानी लष्करात राजीनाम्यांचा वर्षाव

  • दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचे माप आता भरले आहे. दहशतवादी कारवायांना बळ देत त्यांनी भारताविरोधी छुपे युद्धच सुरु ठेवलेले आहे. आता या पाकिस्तानला धडा शिकवावा अशी भारतीयांची मागणी आहे.
  • अशातच पाकिस्तानवर भारत कधीही हल्ला करु शकतो, अशी शक्यता पाकिस्तानच्या लोकांनाही वाटते. ते काळजीत पडले आहेत, पाकिस्तानी प्रशासन तर हादरुन गेले आहे, त्यामुळेच की, काय आता पाक लष्करामध्ये मोठ्या हालचाली दिसून येत आहे. आता एक मोठी बातमी आता समोर आली आहे.
  • भारत हल्ला करु शकतो या भीतीने पाकिस्तानात दहशत आहे, यामुळेच पाकिस्तानी लष्कराकडून राजीनाम्यांचा वर्षाव होत आहे, जवळपास दोन दिवसांत सुमारे पाच हजार जवानांनी नोकरी सोडली आहे. भारत-पाक सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्करात राजीनाम्यांचा महापूर आला आहे.
  • प्राप्त माहितीनुसार, एलओसीवर भारत आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये वाढत्या तणावामुळे पाकिस्तानी लष्कराचे जवान आणि अधिकारी आपला जीव वाचवण्यासाठी राजीनामा देत आहेत.

Related Articles

Back to top button