सोलापूर
ब्रेकिंग! सोलापूर दक्षिणमध्ये नवा ट्विस्ट
- राज्यात पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. यंदाची विधानसभा निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाकडून उमेदवारी याद्या जाहीर केल्या जात आहेत. आतापर्यंत भाजपा, शिंदे गट, अजितदादा पवार गट व मनसेकडून उमेदवार जाहीर झाले आहेत. अशातच आता ठाकरे गटाने देखील एबी फॉर्मचे वाटप सुरू केले आहे.
- ठाकरे गटाकडून या नेत्यांनी एबी फॉर्म घेतले : सुधाकर बडगुजर(नाशिक पश्चिम), वसंत गिते(नाशिक मध्य), अद्वय हिरे (मालेगाव बाह्य), एकनाथ पवार (लोहा कंधार), के पी पाटील, राधानगरी विधानसभा, बाळा माने, रत्नागिरी विधानसभा, अनुराधा नागवडे, श्रीगोंदा विधानसभा, गणेश धात्रक, नांदगाव, उदेश पाटेकर, मागाठाणे विधानसभा, अमर पाटील, सोलापूर दक्षिण, दीपक आबा साळुंखे पाटील, सांगोला.
- दरम्यान अमर पाटील हे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रतिकांत पाटील यांचे चिरंजीव आहेत तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राहिले आहेत.
- लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशानंतर त्यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघात आपली जोरदार मोर्चेबांधणी केली, त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांनीही उमेदवारी मिळण्यासाठी जोर लावला होता.