सोलापूर

राहुल गांधी करणार प्रणिती शिंदेंशी लग्न?

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या लग्नाची चर्चा खूप रंगली होती. राहुल गांधी आणि सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर चर्चांना ऊत आला होता.

त्यामुळे या नात्याबाबत राज्यभरात वेगवेगळे तर्कवितर्क काढले जाऊ लागले. आता याबाबत प्रणिती शिंदे यांचे वडील आणि माजी मुख्यमंबी सुशीलकुमार शिंदे यांनीच यावर भाष्य केले आहे. राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांच्या विवाहाच्या चर्चा केवळ अफवा आहेत, असे स्पष्टीकरण सुशीलकुमार शिंदे यांनी दिले आहे.

शुभंकर मिश्रा यांच्या एका शोदरम्यान सुशीलकुमार शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, माझी मुलगी प्रणिती खासदार आहे. खासदार म्हणून राहुल गांधींशी हस्तांदोलन केले म्हणून काय झाले? अशा प्रकारे लग्नाच्या अफवा पसरवणे चुकीचे आहे.

Related Articles

Back to top button