राजकीय

ब्रेकिंग! अजितदादा गटात राडा

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. पक्षाने दिलेली राज्यसभेची ऑफर स्पष्ट शब्दांत नाकारताच त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेतही दिले आहे. जहाँ नही चैना, वहा नही रहना…असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

नागपूरमध्ये सुरू झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या विस्तारात अजितदादा पवारांच्या पक्षाने भुजबळ व दिलीप वळसे-पाटील यांना स्थान दिले नाही. हा सर्वांसाठीच धक्का होता. वळसे-पाटील यांची यावरची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही. मात्र, भुजबळ यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलने यावर भाष्य केले आहे. ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते.

मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद सुरू असताना भुजबळ यांनी ओबीसी समाजाची बाजू लावून धरली होती. त्याचेच हे बक्षीस आहे का, असे पत्रकारांनी विचारले असताना भुजबळ यांनी होकारार्थी उत्तर दिले. मला डावलले जाईल हे मला अपेक्षित नव्हते. महायुती सरकार येण्यामध्ये लाडकी बहीण आणि ओबीसी समाजाचा मोठा वाटा होता. सभागृहात दोन्ही बाजूंचे सदस्य अंगावर येत असतानाही ओबीसींची बाजू मी कायदेशीरपणे मांडली होती. थेट लढ्यात उतरलो होतो. जरांगे पाटील यांना अंगावर घेतले होते. या सगळ्याचा महायुतीला फायदा झाला असे निवडून आलेले आमदारही मान्य करतात, असे भुजबळ म्हणाले.

Related Articles

Back to top button