सोलापूर

ब्रेकिंग! सोलापूरकरांना खुशखबर

  • सोलापूर :- प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर या कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु होणार असून ,वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गदर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व बऱ्याच वेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा, यासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहीत शुल्क भरुन हवे असतील त्यांनी दिनांक 21ऑक्टोबर 2024 रोजी सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 या दरम्यान विहीत नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी (केवळ क्र 16 अन्वये जारी झालेले डी डी), पत्त्याचा पुरावा, आधार लिंक मोबाईल नंबर, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करावा. सदर डीडी फक्त” Dy R.T.O. Solapur ” यांच्या नावे नॅशनलाईज शेडयुल्ड बँकेचा असावा. या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील. 
  • दुचाकी वाहनांच्या मालिकेचे वेळापत्रक (MH 13 EQ)
  • दिनांक- 21 ऑक्टोबर 2024- तिप्पट शुल्कचे अर्ज व परिवहन संवर्ग वाहनांसाठी नियमित अर्ज स्विकारणे.- वेळ – 11 ते 4
  • दि. 21 ऑक्टोबर 2024 – सायंकाळी 05.00 वाजता यादी जाहीर,
  • दि. 22आक्टोबर 2024 – दुपारी ०२ वाजेपर्यत बंद लिफाफ्यात लिलावासाठीचे डीडी स्विकारणे . रुपये 300/- पेक्षा जास्त रकमेचे डीडी जमा करणे गरजेचे.
  • दि. 22आक्टोबर 2024- तिप्पट शुल्काच्या आलेल्या अर्जासाठी व परिवहन संवर्ग वाहनांसाठी आलेल्या डबल अर्जाचा लिलाव दुपारी 04.00 वाजता.

Related Articles

Back to top button