सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडची गॅंगस्टर बिश्नोईला ऑफर

Admin
1 Min Read

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो शेअर करत एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. सलमानसोबतच्या नात्याबद्दल अनेकवेळा उघडपणे बोलणाऱ्या सोमी अलीने अलीकडेच एका पोस्टने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवून दिली आहे. सलमानचा शत्रू म्हणून सध्या चर्चेत असलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने लिहिलेली आहे.

सोमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, हा बिश्नोई यांना थेट संदेश आहे. नमस्ते! लॉरेन्स भाई, तुम्ही तुरुंगातून देखील झूम कॉल करत आहात, असे मी ऐकले आणि पाहिले. म्हणून मला तुमच्याशी थोडे बोलायचे आहे. हे कसे शक्य होईल, हे कृपया मला तुम्ही सांगा. संपूर्ण जगात माझे सर्वात आवडते ठिकाण राजस्थान आहे. आम्हाला तुमच्या मंदिरात पूजेसाठी यायचे आहे. पण आधी तुम्ही झूम कॉल करा. पूजेनंतर थोडी चर्चादेखील करू या. विश्वास ठेवा, हे तुमच्यासाठी फायदेशीर आहेत. जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर दिला तर फार मोठे उपकार होतील, धन्यवाद!

सध्या सलमान हा बिश्नोई गॅंगच्या रडारवर असल्याचे वृत्त आहे. सोमीने आज सकाळी ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने बिश्नोईला डायरेक्ट मेसेज केला आहे. सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडची ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. आता सलमानच्या गर्लफ्रेंडने केलेली पोस्ट कोणते नवीन वादळ घेवून येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच बिश्नोई सोमी अलीला भेटणार का? याकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

Share This Article