क्राईम
पुणे- सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल्स बसला धडक
- कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारने पुणे- सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे ट्रॅव्हल्स बसला पाठीमागून धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसून राजश्री यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून ट्रॅव्हल्सचेही मोठे नुकसान झाले आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार,पुणे- सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे आज पहाटेच्या सुमारास राजश्री मुंडे यांच्या कारने ट्रॅव्हल्स बसला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर, राजश्री यांनाही किरकोळ दुखापत झाली. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु, कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.