सोलापूर

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मसरे परिवारातर्फे मसाला दूध वाटप

सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांची कोजागिरी पौर्णिमेदिवशी करण्यात आली. यानिमित्त सोलापूरहून तुळजापुरला जाणाऱ्या देवी भक्तांना मसाला दुध वाटप करण्यात आले. 

हा कार्यक्रम श्री रूपाभवानी देवी मंदिर, ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे, सुनील मसरे, अनिल मसरे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे यांच्या हस्ते पार पडला.

 तत्पूर्वी मंदिरात पहाटे काकडआरती, दूध आणि दह्याचा अभिषेक करून महाआरती करण्यात आली. नवरात्रीत मंदिरामध्ये दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मंदिर परिसर गजबजून गेला होता.

हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. नवरात्र दिवस अत्यंत पवित्र आणि पवित्र मानले जातात. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला एक विशेष रंग देण्यात आला आहे, जो दुर्गा देवीच्या रूपाशी संबंधित आहे. यामध्ये नऊ दिवस शक्तीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्यात आली. देवीच्या प्रत्येक रूपाला तिचा आवडता नैवेद्य मसरे कुटुंबीयांच्या वतीने दाखवण्यात आला.

नवरात्रोत्सवात कुलस्वामिनी रुपाभवानी देवीची मनोभावे पूजा करतो. यामध्ये खूप वेगळे समाधान दडलेले असून याचे पूर्ण श्रेय पूर्वजांना जाते. श्रीदेवीचे आशीर्वाद सोलापूरकरांवर कायम राहू दे हीच मनापासून प्रार्थना.

मल्लिनाथ मसरे, ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी

Related Articles

Back to top button