मनोरंजन

दुःखद! मराठी सिनेसृष्टीला धक्का

मराठी मालिका, नाटक आणि चित्रपट, इतकंच नव्हे तर हिंदी मालिका आणि चित्रपटातूनही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 

त्यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अतुल यांची निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

अतुल परचुरे हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांनी कित्येक दिवस उपचार घेतले. उपचारानंतर त्यांची प्रकृती बरी झाली होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली होती. त्यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये कमबॅक केला होता. मात्र, आज रोजी अतुल यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. 

Related Articles

Back to top button